Friday, 6 July 2012

Marathi poem 2


संथ शांत सागरात
सगळेच असतात बरोबर
हातात हात द्यायला.
लाटेच्या एखाद्या जोरदार तडाख्यानंही,
तसे हात सुटत नसतात –
पण अशा वेळी कोणाचेच
स्पर्श नकोसे वाटतात.
कोणतेच बंध असे
आघातानं तुटत नाहीत,
वा-यावर भरकटायला,
आपल्याला सोडून देत नाहीत.
पण मनातून कुठेतरी
आपल्यालाही असतं माहीत –
बाकीच्या सगळ्यांनी
काठानंच पोहायचं असतं,
शेवटी आपलं आयुष्य
आपल्यालाच जगायचं असतं.
                                                           (composed around 1996) 

No comments:

Post a Comment