मनाने बांधले स्वप्नांचे इमले
डोळ्यात रंगीत, मोरपंख.
जगाची जनाची, लागता
चाहूल
सारेच महाल, भुईराख.
एकेक वेचिता आयुष्याचे रंग
सत्याचीच ठेच, रक्त रक्त.
शिल्प होता पुरे
झाली सांजवेळ
साराच हरवे, ताळमेळ.
सख्या आता नाही कसलीच आच
राहू दे अपुरे, जे ही जैसे.
सुखाचे सोहाळे
वाजतील दारी
दु:खाचे डोहाळे, झाकू
कोठे.
त्यांचीच निवांत जिवाला सोबत
पाठराखणही, पैलतीरी.
(17-10-12)
Khup Chann...Its awesome..fabulous...
ReplyDelete@Deepashri
ReplyDeleteSukhache sohale hotil ghari, Dukhhachahi wisar padel
Sukhdukhhachya ya khelat, Mananchi gumfan ghatta julel!!!!
Kshama Bade